भूमी डेव्हलपर मागच्या २० वर्षांपासून बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी बांधकाम क्षेत्रातील अनेक नामांकित आणि अग्रेसर समूहांबरोबर कंत्राटदार म्हणून काम केले आहे ज्यात एन्रॉन, वोएनजीसी, फ्युचर ग्रुप, नाहर, रिलायन्स, टाटा, विएसएनल, हिरानंदानी, आदित्य बिर्ला ई. चा समावेश आहे.
कोकणच्या भूमीशी जोडलेली नाळ आणि तिच्याशी असलेले अतूट नाते ह्यामुळेच भूमीच्या संस्थापकांनी पक्के ठरवले होते की जर स्वतःचा कुठला प्रकल्प सुरू करायचा तर तो कोकणातच. आणि म्हणूनच भूमी डेव्हलपरने गुहागरला २ गृहप्रकल्प सुरू केले ज्यातून लोकांना मिळू शकेल निसर्गाच्या सानिध्यात एक शांत आणि निर्मळ असा आनंद.
भूमी डेव्हलपर चे एकच उद्धिष्ट आहे की घर घेणाऱ्यांना फक्त समाधानी करून उपयोग नाही तर ते दिलखूष झाले पाहिजेत.